वर्तमानपत्र वाटप करणाऱ्या कामगारांनाही लाभ मिळणार
मुंबई, 19 जुलै 2017/AV News Bureau:
असंघटीत कामगारांसाठी राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापना केली जाणार आहे. या मंडळामध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार आहे, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. असंघटीत कामगारासाठी नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील 3.65 कोटी असंघटीत कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
कामगार कल्याण मंडळाचा या घटकांना लाभ
- विडी कामगार
- ऊसतोड कामगार
- बांधकाम मजूर
- दगड खाणीतील कामगार
- विणकर
- यंत्रमाग कामगार
- शेतकरी
- मच्छीमार
- शेतमजूर
- कचरा गोळा करणारे कामगार
- घर कामगार
- रिक्षा ओढणारे कामगार
- वर्तमानपत्र वाटप करणारे कामगार
याशिवाय अगरबत्ती बनवणे, कृषी, कृषी अवजारे हाताळणे इत्यादी 122 उद्योग व व्यवसायातील असंघटीत कामगारांचा समावेश असणार आहे.