नवी मुंबई, 19 जुलै 2017/AV News Bureau:
कोकण विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 31 जुलै रोजी दुपारी 3वाजता सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांना कोंकण विभागातील शासनाच्या निरनिराळया कार्यालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी द्यावयाच्या असतील, त्यांनी अशा तक्रारी लेखी स्वरुपात आवश्यक त्या पुराव्यासह या समितीसमोर 31 जुलै 2017 रोजी बैठकीच्या वेळेपूर्वी वरील पत्यावर (दोन प्रतीत) समक्ष द्याव्यात, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्ताल कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.