मुंबई, 15 जुलै 2017/AV News Bureau:
डिसेंबर 2018 पर्यंत 2 लाख ग्रामपंचायतींमध्ये 100 एमबीपीएस ब्राडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचे उद्दिष्ट केंद्रे सरकारने ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे एक लाख ग्रामपंचायतींना 500 च्या वर नेट टू नेट कनेक्टिव्हिटी पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय संदेशवहन राज्यमंत्री मनोज सिन्हा सांगितले.
नॅशनल सुपर एक्स्प्रेस इन्फोर्मेशन हायवे- नेक्स्ट जनरेशन आणि ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क टेक्नॉलॉजी या दोन योजनांचा लोकार्पण कार्यक्रम शुक्रवारी मुंबई झाला.त्यावेळी ही माहिती दिली.
एनजीओटीएन ही 330 कोटी रुपयांची योजना 100 शहरांमध्ये लागू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे 99.99 टक्के कृती क्षमता केंद्र 24X7 तत्वावर बंगलोर येथे चालू करण्यात येणार आहे. 10 जी पासून 100 जी ऑप्टिकल फायबरची क्षमता वाढवणे असे बीएसएनएलच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे बीएसएनएलच्या किरकोळ ग्राहकांना लँडलाईन, एफटीटीएच आणि मोबाईल सेवांच्या क्षमतेत वाढ करुन मिळेल,असेही सिन्हा यांनी सांगितले.
आत्तापर्यंत 100 शहरांपैकी 45 शहरांमध्ये एनजीओटीएन सेवा आजपासून सुरु झाली असून उर्वरित 55 शहरांमध्ये मार्च 2018 पासून ही सेवा उपलब्ध होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.