मुंबई, 12 जुलै 2017/AV News Bureau:
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने 60 विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 142 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली आहे. त्यात आता आणखी 60 गाड्यांची भर पडली आहे.
1.पुणे-सावंतवाडी रोड साप्ताहिक गाडी (8 फेऱ्या)
- 01437 विशेष गाडी 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी पुण्याहून दुपारी 4.35 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.20 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल. (एकूण 4 फेऱ्या)
- 01438 विशेष गाडी 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या काळात प्रत्येक सोमवारी सकाळी 8 वाजता सावंतवाडी रोडहू सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 9.25 वाजता पोहोचेल. (एकूण 4 फेऱ्या)
- गाडीचे थांबे
या दोन्ही विशेष गाड्यांना लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापुर रोड, वैभववाडी रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 10 सेकंड क्लास सीटींग, 8 सामान्य दुसऱ्या दर्जाचे डबे.
- पनवेल – सावंतवताडी रोड साप्ताहिक विशेष (8)
- 01189 विशेष गाडी 19 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळात प्रत्येक शनिवारी सायंकाळी 7.35 ला पनवेल स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.20 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल. (एकूण 4 फेऱ्या)
- 01190 विशेष गाडी 19 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळात प्रत्येक शनिवारी सकाळी 8 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6.20 ला पनवेल स्थानकात पोहोचेल. (एकूण 4 फेऱ्या)
- गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना रोहा, माणगाव, वीर, खेड , चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांमना 10 दुसऱ्या दर्जाचे चेअर कार आणि 8 सामान्य द्वीतीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत.
3.पनवेल – सावंडवाडी रोड साप्ताहिक विशेष (8)
- 01191 ही विशेष गाडी 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात प्रत्येक रविवारी सायंकाळी 7.35 ला पनवेल स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.20 ला सावंतडवाडी रोड स्थानकात पोहोचेल. (एकूण 4 फेऱ्या)
- 01192 ही विशेष गाडी 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात प्रत्येक रविवारी सकाळी 7.10 ला सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6.20 ला पनवेल स्थानकात पोहोचेल. (एकूण 4 फेऱ्या)
- गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना रोहा, माणगाव, वीर, खेड , चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांमना 10 दुसऱ्या दर्जाचे चेअर कार आणि 8 सामान्य द्वीतीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत.
- लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी साप्ताहिक विशेष (एकूण 8 फेऱ्या)
- 01043 विशेष गाडी 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी एलटीटीहून पहाटे 1.10 ला सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
- 01044 ही विशेष गाडी 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी दुपारी 1 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 12.20 ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
- डब्यांची रचना
1 एसी टु टायर, 3 एसी थ्री टायर, 13स्लीपर आणि 8 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
- लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक विशेष (6 फेऱ्या)
- 01045 विशेष गाडी 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळात प्रत्येक सोमवारी एलटीटीहून पहाटे 1.10 ला सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
- 01046 विशेष गाडी 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळात प्रत्येक सोमवारी करमाळी स्थानकातून दुपारी 1 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 12.20 ला एलटीटीला पोहोचेल.
- गाड्यांचे थांबे
या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
- डब्यांची रचना
1 एसी टु टायर, 3 एसी थ्री टायर, 13स्लीपर आणि 8 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
6.सीएसएमटी- चिपळुण – आठवड्यात तीनदा (एकूण 22 फेऱ्या)
- 01179 विशेष गाडी 20 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या काळात प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी सीएसएमटीहून पहाटे 5 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 10.20 ला चिपळुण स्थानकात पोहोचेल.
- 011८० विशेष गाडी 20 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या काळात प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी 5.45 वाजता चिपळुणहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४० ला सीएसएमटीला पोहोचेले.
- गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, कोलाड, इंदापुर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवानखवटी, खेड आणि अंजनी स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
- डब्यांची रचना
६ डबे सेकंड क्लास चेअर, ६ जनरल डबे जोडण्यात येतील.