मुंबई, 3 जुलै 2017/AV News Bureau:
हापूस निर्यात होणाऱ्या देशांमध्ये असलेल्या प्रोटोकॉल नुसार राज्यात उपलब्ध असलेल्या व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधा, विकीरण सुविधा रत्नागिरी व गोरेगांव येथील आंबा निर्यात सुविधा केंद्रात अद्ययावत करुन घेण्यात आल्या. त्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया,जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आंबा निर्यात झाला आहे.
‘मॅंगोनेट’ अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच माल निर्यातीकरीता वापरण्यात येतो. याद्वारे शेतकऱ्यांचा माल त्याच्या शेतावरुनच निर्यातदार खरेदी करतात व पर्यायाने शेतकऱ्याच्या मालास चांगला दर प्राप्त होत आहे,अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
- यावर्षीअमेरिकेत 1100 मे. टन आंबा निर्यात करण्यात आला. गेल्यावर्षी हे प्रमाण 750 मे. टन इतके होते. पणन मंडळाचे वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन गेल्या वर्षीच्या 190 मे. टनाच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच 435 मे. टन आंबा प्रक्रिया करुन अमेरीका येथे निर्यात करण्यात आलेला आहे.
- ऑस्ट्रेलिया सारखी शाश्वत बाजारपेठ देखील सहकार मंत्री यांच्या पाठपुराव्याने या हंगामामध्ये खुली झाली. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्याच वर्षी सुमारे43 मे. टन आंबा विकिरण प्रक्रिया करुन निर्यात करण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियामधील तीनही प्रमुख बाजारपेठात (मेलबर्न, ब्रिस्बेन, सिडनी) राज्यातील आंबा निर्यात झालेला आहे.
- जपानमधील निर्यात -12 मेट्रिक टन
- कोरियामधील निर्यात -45 मेट्रिक टन