ठाणे,1 जुलै 2017/AV News Bureau:
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे रविवार,2 जुलैरोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ठाणे महापालिकेने उत्कृष्टपणे राबविली आहे. या मोहिमेस सर्व स्तरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. उद्याही विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या दिवशी महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी बुथवर व त्यानंतर पुढील पाच दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.