ठाणे 29 जून 2017/AV News Bureau:
४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ 1 जुलै रोजी ऐरोली येथे होणार आगेय या कार्यक्रमास राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोस्टल अँड मरिन बायोडायव्हर्सिटी सेंटर, कांदळवन फॉरेस्ट २, दिवानगर रोड, ऐरोली सेक्टर १० येथे सकाळी ९.३० वाजता या सात दिवस चालणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती ठाणे वन विभागाचे उप वन संरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली.