मुंबई, 29 जून 2017/AV News Bureau>
आषाढी एकादशीसाठी पंढरपुरला जाणाऱ्या भाविकासांठी मध्य रेल्वेने राज्याच्या विविध भागांतून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या दौंड/नवीन अमरावती/खामगाव/ लातुर/ नागपुर / आणि मिरज- पंढरपुर तसेच मिरज- कुर्डुवाडीदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
1.दौंड-पंढरपुर अनारक्षित विशेष (16 फेऱ्या)
- गाडी क्रमांक 01497 डाउन दौंड-पंढरपुर ही अनारक्षित विशेष गाडी 2 जुलै ते 9 जुलै या काळात (एकूण 8 फेऱ्या)सकाळी 8 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी1 वाजता पंढरपुरला पोहोचेल.
- 01498 अप पंढरपुर-दौंड ही विशेष गाडी 2 जुलै ते 9 जुलै या काळात (एकूण 8 फेऱ्या) दुपारी 3 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता दौंडला पोहोचेल.
- थांबे – या विशेष गाडीला भिगवण, पारेवाडी, जेउर, कुर्डुवाडी आणि मोडलिंब या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या गाड्यांना 12 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.
2.नवीन अमरावती / खामगाव-पंढरपुर अनारक्षित विशेष (एकूण 7फेऱ्या)
- 01155 डाऊन नवीन अमरावती-पंढरपुर अनारक्षित विशेष गाडी 29 जून, 1 आणि 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजता नवीन अमरावती येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 ला पंढरपुरला पोहोचेल.
- 01156 ही विशेष गाडी 29, 30 जून 5 जुलै आणि 6 जुलै या दिवशी दुपारी 4 वाजता पंढरपुरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता नवीन अमरावती येथे पोहोचले.
- या गाडीला बडनेरा, मुर्तिझापुर, अकोला, शेगाव, जालंब, नांदुरा, मलकापुर, बोदवाड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, भिगवन, जेउर आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- गाडी क्रमांक01155/01156 खामगावसाठीचे डबे जालंब स्थानकावर जोडले आणि काढले जाणार आहेत. त्यानंतर खामगाववरून ही गाडी 01153/01154 क्रमांकाने खामगाव आणि जालंबदरम्यान चालविण्यात येतील. या गाड्यांच्या वेळा पुढीप्रमाणे-
- 01153 विशेष गाडी खामगाववरून सायंकाळी 4.20 ला सुटेल आणि त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता जालंबला पोहोचेल.
- 01154 विशेष गाडी जालबंवरून सकाळी 8.20 ला सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 8.40 ला खामगावला पोहोचेल.
- या गाड्यांना 20 डबे जोडण्यात येणार असून त्यामध्ये 18 सामान्य दुसऱ्या दर्जाचे डबे आणि 2 सामान्य दुसऱ्या दर्जाच्या डब्यांसह गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे.
- कुर्डूवाडी-पंढरपूर विशेष (8 फेऱ्या)
- 01495 ही गाडी 30 जून, 1,7,8 जुलै रोजी पंढरपुरहून दुपारी 1 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता कुर्डुवाडीला पोहोचेल.
- 01496 गाडी 30 जून,1,7,8 जुलै रोजी दुपारी 2.30 ला कुर्डुवाडीहून सुटेल आणि दुपारी 3.35 ला पंढरपुरला पोहोचेल.
- या गाडीला मोडलिंब स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला 7 दुसऱ्या दर्जाचे डबे, 2 स्लीपरचे डबे आणि 2 सामान्य दुसऱ्या दर्जाच्या डब्यंसह गार्डवॅन असणार आहे.
- लातुर- पंढरपुर विशेष (10)
- 01489 विशेष गाडी 30 जून, 3,4,5 आणि 7 जुलै रोजी सकाळी 7.45 ला लातुरहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता पंढरपुरला पोहोचेल.
- 01490 विशेष गाडी 30 जून, 3,4,5 आणि 7 जुलै रोजी दुपारी 3.30 ला पंढरपुरहून सुटेले आणि सायंकाळी 7.25 ला लातुरला पोहोचेल.
- या गाड्यांना औसा रोड, ढोकी, येडसी, उस्मानाबाद, पांगरी, बारसी टाउन, शेंडरी, कुर्डुवाडी आणि मोडलिंब स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला 9 स्लीपर, 4 दुसऱ्या दर्जाचे डबे, 2 दुसऱ्या दर्जाच्या डब्यांसह गार्ड ब्रेक व्हॅन जोडण्यात येणार आहे.
- नागपुर-पंढरपुर विशेष (4)
- 01226 ही विशेष आरक्षित गाडी 1 आणि 3 जुलै रोजी सकाळी 7.50 ला नागपुरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.10 ला पंढरपुरला पोहोचेल.
- 01225 ही विशेष आरक्षित गाडी 2,5 जुलै रोजी सकाळी 5.30 ला पंढरपुरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.30 ला नागपूरला पोहोचेल.
- या गाड्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदुर, बनवेर, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या गाडी 1 एसी 2 टायर, 1 एसी थ्री टायर आणि 8 स्लीपरचे डबे जोडण्यात येणार आहेत.
6.मिरज-पंढरपुर डीईएमयु विशेष 18फेऱ्या
- 01493 डीईएमयु विशेष गाडी 1ते 7 जुलै या काळात सकाळी 5.30 वाजता मिरजहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 8.20 ला पंढरपुरला पोहोचेल.
- 01494 डीईएमयु विशेष गाडी 1 ते 9 जुलै या काळात सकाळी 9.40 ला पंढरपुरहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 ला मिरजला पोहोचेल.
- या गाडीला अरग, सलागरे, कवठ महांकाळ, ढालगाव, जत रोड म्हसोबा डोंगरगाव आणि सांगोला येथे थांबा देण्यात येणार आहे. या गाड्यांना 12 डिईएमयु डबे जोडण्यात येणार आहेत.
7 मिरज-कुर्डुवाडी डीईएमयु (18 फेऱ्या)
- 01491 डीईएमयु विशेष गाडी 1 ते 9 जुलै या काळात मिरजहून दुपारी 2.40 ला सुटेल आणि रात्री 8 वाजता कुर्डुवाडीला पोहोचेल.
- 01492 डीईएमयु विशेष गाडी 1 ते 9 जुलै या काळात रात्री 8.30 ला कुर्डुवाडीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.45 मिरज येथे पोहोचल.
- या गाड्यांना अरग, सलगर, कवठे महांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपुर, मोडलिंब या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाड्ययांना 12 डीईएमयु डबे जोडण्यात येणार आहेत.
- तिकिट बुकींग
01495/01496, 01489/01490, 01226/01225 या गाड्यांचे तिकिट बूकींग विशेष शुल्कासह 29 जूनपासून पीआरएस, इंटरनेट किंवा वेबसाइट www.irctc.co.in वर उपलब्ध आहे. दुसऱ्या श्रेणीच्या डब्यांसाठी तिकिट बुकींगची गरज लागणार नसून सर्वसाधारणतिकिट काढून प्रवास करता येणार आहे.