नवी दिल्ली, 28 जून 2017/AV News Bureau:
युपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मीरा कुमार यांना 17 राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. एनडीएतर्फे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदासाठी रिंगणात आहेत. येत्या 17 जुलै रोजी मतदान होणार असून मतमोजणी 20 जुलै रोजी होणार आहे.
मीरा कुमार यांचा अर्ज भरताना सोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. अर्ज भण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या अर्जांची छाननी होणार आहे. तर 1 जुलैपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत.