नवी मुंबई, 27 जून 2017/AV News Bureau:
मोरबे धरण परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे.
नवी मुंबईसाठी अतिशय महत्वाचे असलेल्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता 88 मीटर इतकी आहे. गेल्या तीन दिवसांत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी 0.68 मीटरने वाढली आहे. 27 जून रोजी मोरबे धरणाच्या पाण्याची पातळी 73.39 मीटर इतकी नोंदली गेली आहे.
दरम्यान, धरण परिसरात आतापर्यंत 633.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. असाच पाऊस पडत राहीला तर मोरबे धरणातील पाण्याची पातळी चांगलीच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.