नवी मुंबई, 25 जून2017/AV News Bureau:
रिपब्लिकन सेनेच्यावतीने सीवूडमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीला सर्वधर्मिय बांधवांनी हजेरी लावली होती. यावेळी रिपब्लिकने सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी हजेरी लावली होती.
या इफ्तार पार्टीला रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल, रायगड जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, भारिप बहुजन महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश डबरासे, एपीएमसीतील कामगार संघटनांचे पदाधिकारी, घर हक्क संघर्ष समितीचे हिरामन पगार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
रमझान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. या सणाला मोठ्या प्रमाणात इतर धर्माचे बांधव हजेरी लावतात, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे,असे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल यांनी यावेळी सांगितले. तसेच या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.