तेजसचा नवा साथीदार

tejas engine

मुंबई, 17 जून 2017/ AV News Bureau:

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास गारेगार करणाऱ्या तेजस एक्सप्रेसला सुस्साट नेणारा नवा साथीदार दिमतीला आला आहे. सदर्न रेल्वेकडून आलेले आणि प्रति ताशी 160 कि.मी. वेगाने धावणारे इंजिन तेजसला जोडण्यात येणार आहे. तेजसच्या रंगसंगतीशी मिळते जुळते वाटावे यासाठी या इंजिनाला नुकतीच मध्य रेल्वेच्या कल्याण येथील कारखान्यात नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. तेजसच्या डब्यांना असलेल्या रंग छटा लक्षात घेवून इंजिनाला रंगोटी करण्यात आली आहे.  त्यामुळे तेजसच्या डब्यांप्रमाणेच इंजिनही एकाच रंगात न्हावून गेले आहे.  ऐन पावसाळ्यात कोकणातील हिरव्या गर्द झाडीतून सुस्साट धावणारी तेजस साऱ्यांचेच लक्ष वेधून घेईल,यात शंका नाही.

तेजसच्या नव्या साथीदाराची (इंजिनाचे) थोडक्यात माहिती

  • WDP3A passenger loco for main line service
  • Loco no … 15516 WDP3A
  • Transmission … AC/DC transmission
  • Maximum speed 160 kmph
  • Engine type … 3100bhp, 16 cylinder, 4 Stroke turbo super charged diesel engine
  • Axle load …  19.5t

 

tejas exp