मध्य रेल्वे मार्गांवर उद्या (18 जून रोजी) मेगा ब्लॉक

मुंबई, 17 जून 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मेन  आणि हार्बर मार्गावर उद्या  मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

         मेन लाइन

कल्याण-ठाणे अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 या काळात मेगाब्लॉक

  • सकाळी 11 ते दुपारी 21 या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट मार्गावरील सर्व गाड्या कल्याण –ठाणे स्थानकांच्या दरम्यान अप स्लो मार्गावरून चालविल्या जातील तसेच कल्याण आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येईल. तसेच सर्वअप फास्ट मार्गावरील गाड्या या काळात नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोप, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकांवर थांबविण्यात येतील . या गाड्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा 20 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 08 ते दुपारी 2.42 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबविण्यात येतील. या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
  • गाडी क्रमांक 50104 रत्नागिरी-दादर गाडी दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. तर गाडी क्रमांक 50103 दादर-रत्नागिरी ही गाडी दिवा स्थानकातून पुढे रत्नागिरीला जाईल.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात

  • सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 या काळात सीएसटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या गाड्या तसेच सकाळी 10.20 ते दुपारी 3.48  या काळात पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसटीसाठी जाणाऱ्या गाड्या बंद राहणार आहेत.
  • या मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात ट्रान्सहार्बर तसेच मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.