17 जूनपासून सेवा सुरू होणार
मुंबई,16 जून 2017/AV News Bureau:
एसटीच्या एसी ‘शिवशाही’ बस सेवेला मुंबई-रत्नागिरी मार्गावर प्रवाशांच्या मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर शिवशाहीची आणखी एक सेवा उद्यापासून म्हणजे 17 जूनपासून पुणे-लातूर मार्गावर सुरू करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाने प्रथमच मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी दरम्यान एसी शिवशाही बस सुरू केली. या बसला पहिल्या दिवसापासूनच कोकणातल्या चाकरमान्यांनी पसंतीची पावती दिली आहे. यामुळे उत्साह दुणावलेल्या एसटी महामंडळाने शिवशाहीच्या आणखी बसेस राज्यातल्या इतर मार्गांवरही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पुणे-लातूर ही नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे.
पुणे –लातुरदरम्यानची शिवशाही बस सेवा
- शिवाजीनगर (पुणे) येथून सकाळी 8.00 वाजता निघून इंदापूर – टेंभुर्णी-कुर्डुवाडी – बार्शी – एडशी – मुरुड मार्गे लातूरला दुपारी 4.00 वाजेपर्यंत पोहचेल
- लातूरहून रात्री 11.00 वाजता निघून बार्शी -इंदापूर मार्गे शिवाजीनगर येथे पहाटे 6.00 वाजता पोहचेल.
बसचे भाडे
- या बसचे तिकीट भाडे प्रती प्रवासी (पुणे – लातूर) रुपये ५०१/-
- पुणे-लातूर शिवशाही बसचे आगाऊ आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना शनिवारपासून https://public.msrtcors.comया संकेतस्थळावर सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
- ss 45 हा कोड (सांकेतांक) वापरून प्रवाशांनाआपले ऑनलाईन आरक्षण करता येईल.