31 डिसेंबरपर्यंत आधार न जोडल्यास बॅंक खाते रद्द होणार
नवी दिल्ली, 16 जून 2017:
बॅंकेत नवीन खाते उघडण्यासाठी तसेच आपल्या खात्यातून 50 हजार रुपये वा त्यापुढील रक्कम काढण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आधार कार्डने न जोडलेली बॅंक खाती 31 डिसेंबर 2017 नंतर रद्द करण्यात येणार आहेत.
मनी लाँडरींग नियमावली 2005 मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार नवीन बँक खाते उघडण्यासाठी आता आधार कार्ड महत्वाचा दस्तावेज मानला जाणार आहे. आधार कार्डाशिवाय यापुढे बँकेत नवीन खाते उघडता येणार नाही. तसेच या निर्णयामुळे देशातील सर्व बँक खातेदारांना आपले आधारकार्डाचा तपशिल 31 डिसेंबरपर्यंत आपापल्या बँकेत जमा करणे बंधनकारक आहे. यापूर्वी बँकेत खाते उघडताना अथवा अधिक रकमेचे व्यवहार करताना पॅन क्रमांक वा फॉर्म 60 भरणे आवश्यक होते. मात्र आता आधार क्रमांक जोडणे अनवार्य करण्यात आले आहे.