नवी मुंबई, 13 जून /AV News Bureau
दहावीच्या परिक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र काही विद्यार्थी मिळालेल्या गुणांबाबत समाधानी नाहीत. अशा विद्यार्थ्यांना गुणपडताळून पहाण्यासाठी तसेच आपल्या उत्तरपत्रिकाही तपासण्यासाठी उद्यापासून अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर एक फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ज्या कारणासाठी अर्ज करायचा आहे त्याचा उल्लेख करून अर्जासोबत गुणपत्रिकेची प्रत जोडावी असे आवाहन बोर्डाच्यावतीने करण्यात आले आहे. विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मुबई विभागातर्पे हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
- गुडपडताळणीसाठी उद्यापासून अर्ज
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, 50 रुपये शुल्कासह अर्ज संबंधित विभागीय मंडळाकडे 14 जून ते 3 जुलै या कालावधीत सादर करायचा आहे.
- उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती मिळणेबाबत
विद्यार्थ्यांना जर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पहायच्या असतील तर त्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवण्यासाठी 14 जून ते 3 जुलै या कालावधीत विभागीय मंडळाकडे त्याबाबत अर्ज करायचा आहे. सोबत छायाप्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये इतके शुल्क रोख अथवा डिमांड ड्राफ्टने संबंधित विभागाकडे जमा करावे लागतील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
- उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कार्यालयीन कामकामाज्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाचा अर्ज निश्चित शुल्कासह विभागीय मंडळाकडे सादर करायचा आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही त्याबाबतची माहिती पाहू शकतात.
- विद्यार्थ्यांसाठी मुंबई विभागीय मंडळाची हेल्पलाइन
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालासंदर्भात विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. मुंबई विभागासाठी 27881075 आणि 27893756 हे दोन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही हेल्पलाइन 20 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.