हरीकृष्ण बैनाळे (93 टक्के) प्रथम
इ.टी.सी.अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचाही निकाल 100 टक्के
नवी मुंबई,13 जून 2017/AV News Bureau:
मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. दहावी बोर्ड परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा निकाल 87.20 टक्के लागला आहे. ऐरोली येथील नमुंमपा माध्यमिक शाळेचा हरिकृष्ण तुकाराम बैनाळे हा विद्यार्थी 93 टक्के संपादन करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये प्रथम आला आहे. घणसोली येथील माध्यमिक शाळेची दरिया तुकाराम चौधरी (92.20 टक्के) ही दुसरी कोपरखैरणे येथील माध्यमिक शाळेतील (हिंदी) आरती हरिशंकर गुप्ता ही विद्यार्थिनी 91.20 टक्के गुण मिळवून तिसरी आली.
त्याचप्रमाणे महानगरपालिकेचा इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचाही निकाल 100 टक्के लागलेला आहे. केंद्रातील स्नेहल साळुंखे या कर्णबधीर विद्यार्थिनीने 77 टक्के गुण संपादन केले असून साक्षी पवार या विद्यार्थिनीने 73 टक्के, रुपाली चौगुले या विद्यार्थिनीने 69 टक्के, शुभम पावडे या विद्यार्थ्याने 67 टक्के, स्मिता उतेकर या विद्यार्थिनीने 64 टक्के व आकाश शिंदे या विद्यार्थ्याने 61 टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्रविण मोरे या अंध विद्यार्थ्याने 57 टक्के गुण संपादन केले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी 17 क्रमांकाचा फॉर्म भरून दहावी बोर्ड परीक्षा दिली होती.
या वर्षी महानगरपालिकेच्या 17 शाळांमधून 2211 विद्यार्थी दहावी बोर्ड परिक्षेला बसले असून 87.20 टक्के इतका महानगरपालिका शाळांचा निकाल लागला आहे.