दहावीचा निकाल 88.74 टक्के, कोकण सरस

दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालामध्ये मुलांना मागे टाकले

नवी मुंबई, 13 जून 2017/AV News Bureau:

दहावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के इतका लागला असून अपेक्षेप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी 91.46 टकके तर मुलांची टक्केवारी 86.51 टक्के इतकी आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 4.95 टक्केने अधिक आहे. कोकण विभागाने इतर विभागांवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागाची निकालाची टक्केवारी 96.18 टक्के तर सर्वात तळाच्या नागपूर विभागाचा निकाल 83.67 टक्के इतका लागला आहे. २४ जूनला दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळणार असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे.

यावर्षी राज्यातून तब्बल 16 लाख 50 हजार499 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 लाख 44 हजार 16 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिला. तर 14 लाख 58 हजार 855 विद्यार्थी पास झाले आहेत.  यंदाचा निकाल 88.74 टक्के असून गेल्यावर्षीचा निकाल 89.56 टक्के लागला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल काहीसा कमी म्हणजे 0.82 टक्के इतका कमी लागला आहे.

मुले आणि मुलांची यशाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

fresh boy and girl

विभागनिहाय नियमित विद्यार्थ्यांची टक्केवारी

divisionwise

श्रेणीनिहाय निकाल (नियमित विद्यार्थी- पहिल्यांदाच दहावीची परिक्षा देणारे)

percentage wise

  • रिपीटर्स

repeaters

  • शाळांचा निकाल

राज्यातील 21 हजार 684 शाळांमधील 16 लाख 50 हजार 499 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 676 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 32 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे. म्हणजे एकही विद्यार्थी पास झालेला नाही.

  • खासगीरित्या परिक्षेला बसलेले विद्यार्थी

राज्यातून खासगीरित्या म्हणजे बाहेरून परिक्षेला एकूण 46 हजार 669 विद्यार्थी बसले होते. त्यांच्या निकालाची टक्केवारी 47.61 टक्के इतकी आहे.