म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी गिरणी कामगारांना 27 जूनपर्यंत मुदत

मुंबई,9 जून 2017/AV News Bureau:

म्हाडातर्फे राबविलेल्या मोहिमेदरम्यान ज्या गिरणी कामगारांच्या वारसांना 2010-2011 मध्ये अर्ज करता आले नाही, त्यांना आता 27 जून 2017 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी म्हाडाने उपलब्ध करून  दिल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिली.

गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस https://millworker.mhada.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय खर्च म्हणून रूपये 150 ऑनलाइन भरावयाचे आहेत.

ऑनलाऐवजी महिंद्रा कोटकच्या पुढील शाखांमध्ये पैसे भरण्याची सोय

  • शॉप क्र. 3/10, तळमजला, सिटी व्ह्यु बिल्डींग, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – 18,
  • वीर महल, स.गृ.निर्माण संस्था, तळमजला, शॉप क्र.9/12, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई-10
  • हॉलमार्क प्लाझा, तळमजला, गुरूनानक हॉस्पीटल जवळ, कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई-51

अधिक माहितीसाठी म्हाडा लॉटरी केंद्र, मित्र कार्यालयाशेजारी गेट नंबर ३, गृहनिर्माण भवन, वांद्रे पुर्व, मुंबई – 51 या कार्यालयास अथवा dycoeastmb@mhada.gov.in येथे संपर्क साधावा.