मुंबई ते रत्नागिरी एसी ‘ शिवशाही ’बस उद्यापासून

st shiv

उद्या, 10 जूनपासून वातानुकूलित बस  सुरू होणार 

मुंबई 9 जून २०१७/AV News Bureau:

कोकणातील चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने आता मुंबई ते रत्नागिरी शिवशाही’ ही अत्याधुनिक सुविधानी सुसज्ज अशी वातानुकूलीत बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, १० जूनपासून ही वातानुकूलित बस कोकणवासीयांच्या सेवेसाठी धावणार असून  मुंबई ते रत्नागिरीचे भाडे ५५६ रुपये असणार आहे.

 

प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ सदैव तत्पर असणाऱ्या एस. टी. महामंडळ दर वेळी नवनवे प्रयोग करत असते. कोकण आणि एस. टी.चे अतूट असे नाते आहे.  एसटी लाल डबा असे हिणवले जात असले तरी कोकणातील चाकरमान्यांचा एस. टी. म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच कोकणातही वातानुकूलित बस सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

 

सदरया वातानुकूलित शिवशाही  बस मध्ये एकूण ४५ पुश बॅक आसने आहेत. प्रत्येक सीटला व्यक्तिगत मनोरंजनासाठी एल. सी. डी. स्क्रीन दिली आहे. सोबतच हेडफोन्स द्वारे एफ. एम. ऐकण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.

शिवशाही बसेस लवकरच महाराष्ट्रभर नवनव्या मार्गांवर सुरु होणार असून लोकांचा ह्यांना उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यश व व्यवस्थापकिय संचालक रणजीत सिंह देओल यांनी व्यक्त केली आहे.

st1

मुंबई ते रत्नागिरी मार्गावरील शिवशाहीचे एकूण तिकीट दर व इतर माहिती

  • मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी दरम्यानचे शिवशाहीचे थांबे
  • मुंबई सेंट्रलमार्गे दादर, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, रामवाडी, माणगांव, महाड, भरणा नाकाम चिपळूण, संगमेश्वर )

 

वेळ:

  • मुंबईहून रात्री ९:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
  • रत्नागिरीहून रात्री १० वाजता, मुंबईला पोहोचण्याची वेळ: सकाळी ७ वाजता

 

तिकीट दर

  • मुंबई ते रत्नागिरी : रु. ५५६
  • मुंबई ते संगमेश्वर : रु. ४८३
  • मुंबई ते चिपळूण: रु. ४२०

 

st tv (1)