नवी दिल्ली, 7 जून 2017/AV News Bureau:
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या 17 जुलै रोजी होणार असल्याची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. सध्याचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. एनडीए तसेच युपीएकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. तसेच कोणताही राजकीय पक्ष आपल्या संसदेतील सदस्यांसाठी किंवा आमदारांसाठी व्हीप जारी करू शकणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम
- निवडणुकीची अधिसूचना 14 जून रोजी काढण्यात येईल.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28 जून असणार आहे.
- 29 जूनला उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल.
- 1 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
- गरज पडल्यास 17 जुलै रोजी मतदान
- मतमोजणी 20 जुलै रोजी होणार