नवी मुंबई, 1 जून 2017/AV News Bureau:सीबीडी बेलापूर येथील अर्बन हाटमध्ये 3 ते 10 जून या काळात विविध चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये 15 राज्यांतील कलाकार भाग घेणार आहेत.
३ जून रोजी- चेतन मेमोरियल ट्रस्ट प्रायोजित तक्षशिला नृत्य अकादमीच्या भरतनाट्यम नृत्यविष्कार सादर करणार आहे. त्याचप्रमाणे “ट्रू लव्ह स्टोरी” आणि “गुड मॉर्निंग मुंबई” हे चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
४ जून रोजी- ज्येष्ठ नागरिकांसाठी दादा –दादी दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक/ निवृत्त नागरिक यांना निरोगी आरोग्य, संतुलित आहार व आनंदी आयुष्य याविषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शन शिबिरानंतर नवी मुंबईतील “हॅपी सिंगर ग्रुप” यांच्या वतीने गाण्याचा कार्यक्रम सादर होणार आहे.
५ जून रोजी- श्रुतिल्या फाईन आर्ट तर्फे कथक नृत्यविष्कार सादर केला जाणार असून त्यानंतर “पैगाम वापसी का” , “ब्रेकिंग ऑल द वे ॲण्ड फायरफ्लाईज इन द अब्यास” या चित्रपटाचे प्रयोग दाखविले जाणार आहे.
६ जून रोजी –अलोक मिश्रा यांच्या परफेक्ट मीडिया फिल्मसमार्फत बच्चे कंपनीसाठी खास चित्रपटांचे आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर पारंपरिक गुजराथी नृत्य सादर केले जाणार आहे.
७ व ८ जून रोजी – दोन्ही दिवशी वेगवेगळे चित्रपट दाखवले जाणार आहेत . यामध्ये “फेमस इन अहमदाबाद” आणि “सुपरस्टार ऑफ कोटी” हे चित्रपट दाखविले जाणार आहे. ८ तारखेला “रायडिंग सोलो टॉप ऑफ द वर्ल्ड” हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
९ जून रोजी- श्रुतिल्या फाईन आर्टच्यावतीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लावणी आणि लेझीम कलाविष्कार सादर केले जाणार आहे.
१० जून रोजी – रसिकांसाठी थेट नृत्य आणि संगीताचे सादरीकरण होणार आहे. श्रुतिल्या फाईन आर्टच्या श्रीमती शशी रमेश कलाविष्कार सादर करणार आहे.
या सांस्कृतिक आणि चित्रपट महोत्सवानंतर फूड कोर्टमध्ये भारताच्या विविध राज्यातील पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.