लोणावळाच्या विकासासाठी भरीव निधी देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, 1 जून 2017/AV News Bureau :

पर्यटनदृष्ट्या लोणावळा शहराचा नावलौकिक संपूर्ण देशभर आहे. या ठिकाणी येणाऱ्यांना लोणावळ्याची वेगळी ओळख व्हावी, त्यांना सोयी-सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात म्हणून या शहराच्या विकासासाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

लोणावळा नगर परिषदेने सुमारे 32 कोटी रूपये खर्चुन बांधलेल्या नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  झाले, त्यावेळी ते बोलत होते.

लोणावळा शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. लोणावळ्याची ही परंपरा टिकविण्यासाठी आणि पर्यटकांनी जास्तीत जास्त आकृष्ट व्हावे, यासाठी लोणावळा नगरपरिषदेला निधीची कमतरता पडू देणार नाही. लोणावळा येथे बहुमजली वाहनतळ उभारणे, रुग्णालयाला निधी देणे, खंडाळा तलाव आणि रोपवे विकसित करणे, या योजनांना नगरविकास विभागाच्या मदतीने मदत केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

cm lonavala