नागरीकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन व वॉट्सॲप क्रमांक जारी
नवी मुंबई, 1 जून 2017/AV News Bureau:
सिडको अधिकारक्षेत्रात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीच्यावेळी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी सिडकोने आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात हा आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. तसेच नागरीकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन व वॉट्सॲप क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.
आपात्कालीन कक्षाद्वारे खालील तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे .
- वृक्षांची पडझड/वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी,
- रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे सुरक्षित करणे,
- पुर/पुरसदृश्य स्थिती,
- रस्त्यांची दुरावस्था,
- रोड व नाल्याजवळील साचलेला कचरा,
- व्यक्तिंचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे,
- आग व आगीचे विविध प्रकार,
- साथीचे रोग
- विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी,
- इमारत कोसळणे,
- भूस्खलन होणे.
नागरिकांना तक्रारीसाठी पुढील क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- एमटीएनएल क्र. 022-27562999
- फॅक्स क्र. 022-67918199
- वॉट्सॲप क्र. 8879450450
- नागरीकांसाठी क्लाऊड क्र.022-39216299