कोकणात पावसाची हजेरी

नवी मुंबई, 31 मे 2017/AV News Bureau:

मान्सून लवकरच महाराष्ट्रात सक्रीय होणार असला तरी कोकण किनारपट्टी भागात पावसाने सकाळी जोरदार हजेरी लावली.  त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीच्या पूर्वतयारीला सुरूवात झाली आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सकाळपासूनच कोसळू लागला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या घटना घडल्या. सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही पावसाने हजेरी लावली. लांजा तालुक्यातील कुवे गावाजवळ सकाळी झाड पडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. त्यामुळे प्रवासांचे अतोनात हाल झाले. दरम्यान राज्याच्या इतर भागातही पावसाने अधून मधून हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस मध्येच रिमझिम पडत आहे. दिवसभर वातावरणात उकाडा निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.