गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 142 गाड्या

नवी मुंबई, 31 मे 2017/AV News Bureau:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर १४२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  सीएसटी/ एलटीटी/ दादर/ पुणे ते करमाळी / सावंतवाडी रोड/ रत्नागिरी दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. लवकरच या गाड्यांच्या तिकिट आरक्षणाच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे.

  1. सीएसटी-करमाळी (दैनंदिन) (24 फेऱ्या)
  • गाडी क्रमांक 01445 ही विशेष गाडी 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात रोज मध्यरात्री 12.30 वाजता सीएसटी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

गाडी क्रमांक 01445 ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे. राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुराई आणि थिविम या स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना
  • 4 एसी थ्री टायर, 5 स्लीपर क्लास, 8 जनरल सेकंड क्लास

 

2) 01446 करमाळी-पुणे (दैनंदिन) (24 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01446 ही विशेष गाडी 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात रोज दुपारी 3.25 ला करमाळी स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.50 ला पुणे रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

गाडी क्रमांक 01446 ही विशेष गाडी थिविम, मदुराई, सावंतवाडी रोड, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वसर रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळुण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि लोणावळा या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येईल.

  • डब्यांची रचना
  • 4 एसी थ्री टायर, 5 स्लीपर क्लास, 8 जनरल सेकंड क्लास

 

3)01447 पुणे-सावंतवाडी रोड (दैनंदिन) – (24 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01447 ही विशेष गाडी 19 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या काळात रोज सकाळी 8.50 ला पुणे रेल्वे स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.20 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

गाडी क्रमांक 01447 ही विशेष गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येईल.

  • डब्यांची रचना

गाडी क्रमांक 01447 या  विशेष गाडी या विशेष गाडीला 4 थ्री टायर एसी, 5 स्लीपर क्लास, 8 जनरल सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.

 

 

4) 01148 सावंतवाडी रोड- सीएसटी (दैनंदिन) – (24 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01448 ही विशेष गाडी 19 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या काळात रोज रात्री 11 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 ला सीएसटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

गाडी क्रमांक 01448 ही विशेष गाडी ही गाडी झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापुर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वस रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळुण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येईल.

  • डब्यांची रचना
  • गाडी क्रमांक 01448 या विशेष गाडीला 4 थ्री टायर एसी, 4 स्लीपर क्लास आणि 8 जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

5)01113/01114  दादर- सावंतवाडी रोड- दादर (आठवड्यातून तीन वेळा)- (एकूण 20 फेऱ्या)

  1. गाडी क्रमांक 01113 ही विशेष गाडी 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात प्रत्येक रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी 7.50 ला दादर रेल्वे स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 7.50 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 0114 ही विशेष गाडी 19 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळात प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी पहाटे 4.50 ला सावंतवाडी रोड स्थानकातून सुटे आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता दादर स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे
  • या दोन्ही गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
  • डब्यांची रचना
  • 1 एसी चेअर कार, 7 सेकंड सिटीग  क्लास, 4 जनरल सेकंड क्लास

 

6) 01185/01186 दादर-रत्नागिरी-दादर साप्ताहिक विशेष (8 फेऱ्या)

  1. गाडी क्रमांक 01185 ही विशेष गाडी 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी रात्री 9.45 ला दादर स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.50 ला रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमाकं 01186 ही विशेष गाडी 19 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळात प्रत्येक शनिवारी सकाळी 9 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता दादर स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना  1 एसी टू टायर, 1 एसी थ्री टायर, 7 स्लीपर क्लास, 8 जनरल सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.

 

 

7) 01187/01188 एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी साप्ताहिक डबल डेकर एसी स्पेशल (6 फेऱ्या)

  1. गाडी क्रमांक 01187 ही विशेष गाडी 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात प्रत्येक मंगळवारी पहाटे 5.33 ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1 वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमाकं 01188 ही विशेष गाडी 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात प्रत्येक मंगळवारी दुपारी 3.20 ला रत्नागिरी स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.20 ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाडीला 8 डबल डेकर एसी चेअर कार डबे जोडण्यात येणार आहेत.

 

 

8) 01037/01038 एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी साप्ताहिक एसी स्पेशल (6 फेऱ्या)

  1. 01037 ही विशेष गाडी 24 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात प्रत्येक गुरुवारी रात्री 9.45 ला एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. 01038 ही विशेष गाडी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात दर शुक्रवारी दुपारी 2.5 ला सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.20 ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या रेल्वेस्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

1 फर्स्ट एसी, 1 फर्स्ट एसी कम  टू टायर एसी, 4 एसी टू टायर आणि 11 एसी थ्री टायर डबे जोडण्यात येणार आहेत.

 

 

9) 01423/01424 पुणे-सावंतवाडी रोड-पुणे साप्ताहिक एसी स्पेशल (6 फेऱ्या)

  1. गाडी क्रमांक 01423 ही विशेष गाडी 24 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 6.45 ला पुणे स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01424 ही विशेष गाडी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी सकाळी 9.30 ला सावंतवाडी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.35 ला पुणे स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण,सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाडीला 13 थ्री टायर एसी डबे जोडण्यात येणार आहेत.