परेश ठाकूर गटनेतेपदी

पनवेल, 29 मे 2017/AV News Bureau:
 पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी मते मिळविणाऱ्या  परेश ठाकूर यांची भाजपाआरपीआय युतीच्यावतीने  गटनेतेपदी आज निवड करण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेकापआघाडीला पराभावाची धूळ  चारणारया भाजपआरपीआय युतीच्या नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांची बैठक मार्केट येथे पार पडली.  या बैठकीत  भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेवर भाजपआरपीआययुतीचा झेंडा फडकाविणाऱ्या विजयी नगरसेवकांचा  सत्कार करण्यात आला.   यावेळी झालेल्या बैठकीत परेश ठाकूर यांची पनवेल महानगरपालिकेच्या गटनेतेपदी सर्वानुमते  निवड जाहीर करण्यात आली.
शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या बैठकीस जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपाचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, गणेश पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, डॉ. मयुरेश जोशी, रविनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान सर्व नगरसेवक आणि मान्यवरांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकॄती पुतळयास तसेच हुतात्मा स्मारकात अभिवादन केले.