प्रचाराचे योग्य नियोजन भाजपच्या पथ्यावर

पनवेल, 26 मे 2017/AV NewsBureau:

विरोधकांवर आगपाखड न करता फक्त केंद्रात भाजप, राज्यात भाजप असल्यामुळे पनवेलमध्येही भाजपची सत्ता आल्यास विकास होणारच, या मुद्द्यावर नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळेच पनवेल महापालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले आहे.

पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चीत करण्यासाठी शेकापने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेतले. तर केंद्रात आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेने आयत्यावेळी युती न करण्याचा निर्णय घेत स्वतंत्र चूल मांडली. त्यामुळे पनवेल महापालिका खरे म्हणजे भाजपसाठी मोठे आव्हान होते. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचा सुरू असलेला जोरदार प्रचार केवळ हवाच ठरणार अशी काहीशी शंकाही निर्माण झाली होती.

मात्र भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोमाने प्रचार केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून होणारी विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविली. पनवेलच्या विकासाला केंद्र आणि राज्य सरकारकडून भक्कम पाठबळ मिळवू असा विश्वास पनवेलकरांच्या मनात निर्माण करण्यात आ.प्रशांत ठाकूर यशस्व ठरले. त्या प्रचारासाठी सोशल मिडियाचा आणि प्रसारमाध्यमांचा सकारात्मक वापर करण्यावर भर दिला. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची सोशल मिडिया टीम ज्यामध्ये मयुर बोरकर, सुमित आदींनी प्रत्येक मतदारापर्यंत प्रशांत ठाकूर यांच्या दशमान कार्यक्रमाला पोहोचविण्यासाठी योग्यपद्धतीने नियोजन केले.  राज्य सरकारमधील मंत्री, भाजपचे नेते यांचा प्रचारातील सहभाग आणि त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यात ही टीम यशश्वी ठरली.

शहराची लोकसंख्या वाढत आहे.पनवेल शहराचा विकास, रस्त्यांचे विस्तारीकरण, 24 तास पाणी पुरवठा, परिवहन सेवा, रुग्णालय आदी मुलभूत सेवा लवकरात लवकरच निर्माण करणे पनवेलकरांसाठी आवश्यक आहे. या गोष्टी राज्य सरकारच्या मदतीने आपणच देवू शकतो, असा विश्वास प्रशांत ठाकूर  सोशल मिडियाच्या तसेच परिणामकारक प्रचाराच्या माध्यमातून पनवेलकरांच्या मनात निर्माण करू शकले.त्यामुळे विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष  करीत विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपला पनवेलकरांनी भरघोस पाठिंबा दिला हे पनवेल महापालिका निवडणुकीच्या निकालातून दिसत आहे.

paresh thak