लातूर, 25 मे 2017/AV News Bureau:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेवून मुंबईकडे येणाऱ्या हेलिकॉप्टरला आज सकाळी अपघात झाला. सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वजण या अपघातातून सुदैवाने वाचले आहेत. हेलिकॉप्टरचा पायलट किरकोळ जखमी झाला आहे़. निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरुन मुंबईच्या दिशेने गुरुवारी सकाळी ११.५८ वा़ च्या सुमारास टेकअप होताना हेलिकॉप्टर अचानक कोसळले़.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारीपासून लातूर जिल्हा दौºयावर होते़ निलंगा येथे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी मुक्काम होता़ गुरुवारी सकाळी ७.३० वा़ हलगरा येथे मुख्यमंत्र्यांनी श्रमदान केल्यानंतर औराद शहाजानी, हंगरगा, अनसरवाडा गावांना भेटी दिल्या आणि तेथील लोकांशी संवाद साधला. कार्यक्रम संपल्यानंतर ते परत निलंगा शहरात येऊन शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडवर मुंबईला रवाना होण्यासाठी आले़. ११.४५ वा़. ते हेलिकॉप्टरमध्ये बसले़. हेलिकॉप्टर ५० ते ६० फुट उंचीवर गेल्यानंतर ते अचानक कोसळले़. नजीकच्या असलेल्या वीज खांबावरील तारांना हेलिकॉप्टरचे पंखे अडकले आणि काही क्षणातच म्हाडा झोपडपट्टीत असलेल्या रस्त्यावरील वीजडीपी व ट्रकच्या मध्यभागी कोसळले़. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सचिव प्रवीण परदेशी व अन्य असे एकूण सहाजण असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र मुख्यमंत्री सुखरुप असल्याचे कळल्यावर सर्वांनाच हायसे वाटले.
https://www.youtube.com/watch?v=x098cIp1kVY