ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याची मुभा
मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:
राज्यातील हॉटेल उद्योजकांनी ग्राहकांकडून मूळ किंमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्यास त्यांच्याविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याची मुभा ग्राहकांना देण्यात आली आहे.तसेच दोषी आढळणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे.
ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत ग्राहकमंचाकडे तक्रार करण्याची मुभा ग्राहकांना देण्यात आली आङे. हॉटेल व्यवस्थापनांनी मूळ किंमतीनुसार जादा रक्कम घेणे, मुळ वस्तुची अदलाबदली, नेमून दिलेल्या व दर्शविलेल्या किंमती पेक्षा जास्त रक्कम घेतल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे.
ग्राहकांच्या सर्वात जास्त तक्रारी या ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तुचे बील आणि अधिक पैसे घेतल्याबाबतच्या असतात. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट यांच्याकडून आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे ऐच्छिक असते. त्यामुळे ग्राहकाचे समाधान न झाल्यास ते नाकारण्याचा अधिकार ग्राहकांना असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने म्हटले आहे.