मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग
मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:
भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्यभर २५ ते २८ मे या काळात प्रत्येक गावात शिवार संवाद सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह भाजपाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत.
राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे या सभांचे नियोजन करीत आहेत. पक्षाच्या शिवार संवाद सभा या अभूतपूर्व उपक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. २५ मे रोजी एकाच दिवशी चार हजार गावांमध्ये सकाळी दोन व सायंकाळी दोन अशा चार हजार सभा होणार आहेत. हा उपक्रम २८ मे रोजी पूर्ण होईल. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपाचे लोकप्रतिनिधी संवाद संवाद साधणार आहेत.
पहिला दिवस
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील लातूर जिल्हा
- प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्हा
- महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा
- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विदर्भातील चंद्रपूर जिल्हा
- शिक्षणमंत्री विनोद तावडे कोकणातील रत्नागिरी जिल्हा
- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे बीड जिल्हा