मुंबई, 22 मे 2017/AV News Bureau:
मुंबई शहरात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी चालविण्यात येणाऱ्या घोडागाडी आणि व्हिक्टोरिया बंद करण्यात आल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठीच्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळांने आज मान्यता दिली.
न्यायालयाच्या घोडागाडी बंद करण्याच्या निर्णयामुळे सुमारे 91 घोडागाडी मालक व 130 घोडागाडी चालक बाधित होणार आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या घोड्यांचेही पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपसमितीने केलेल्या शिफारशींनुसार संबंधित घोडागाडी चालक व मालक यांना बृहन्मुंबईमध्ये उपलब्ध असलेल्या जागेवर पथविक्रीबाबतच्या निकषांनुसार फेरिवाला परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
फेरिवाला परवाना प्राप्त केलेल्या या बाधित घोडागाडी चालकांना 1 लाख रुपये एका वेळची एकरकमी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. फेरिवाला परवाना न घेतल्यास 3 लाख रुपयांची एकवेळची एकरकमी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.