मध्य रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई, 20 मे 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर, हार्बर मार्गावर आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत मेन मार्गावर सीएसटी ते ठाणे आणि ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेल या स्थानकांदरम्यान तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.

         मेन लाइन

  • सकाळी 38 ते दुपारी 2.54 या कालावधीत सीएसटीहून सुटणा-या डाउन जलद आणि सेमी जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुंलंड या स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. ठाण्यानंतर जलद मार्गावरील लोकल कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे सायंकाळी पाचपर्यंत लोकल १० ते १५ मिनीटे उशीराने धावणार आहेत.
  • सकाळी 46 ते दुपारी 3.18 या कालावधीत ठाण्याहून सुटणारी अप जलद आणि सेमी जलद मार्गावरील लोकल आपल्या निर्धारित स्थानकांव्यतिरिक्त मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबेल.

हार्बर मार्गावरील लोकल

  • कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 135 ते दुपारी 3.37 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. काळात सीएसटीहून पनवेल,बेलापूर आणि वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसटीसाठी सुटणाऱ्या लोकल बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • या मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4 या काळात ट्रान्सहार्बर तसेच मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.