मुंबई, 14 मे 2017/ AV News Bureau:
गेल्या काही दिवसांपासून बरसणा-या मॉन्सूनपूर्व सरीनी यंदा मॉन्सून लवकर दाखल होणार असे दिलेले संकेत खरे ठरले आहेत. आज दुपारी अंदमानचा दक्षिण समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे.
पुढील 72 तासांत दक्षिण-पश्चिमी वा-यामुळे मॉन्सूला पोषक वातावरण मिळेल अशी आशाही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीवर तो केरळ आणि महाराष्ट्रात कधी दाखल होईल हे अवलंबून आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी आणि उष्णतेच्या लाटेने लोकांचे चांगलेच हाल झाले होते. त्यामुळे लवकर पाऊस पडावा, अशी साऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे मान्सून अंदमानात दाखल झाल्यामुळे यावर्षी वेळेत पावसाची हजेरी लागणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.
14 ते 16 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर जेरदार पर्जनवृष्टी होईल. यादरम्यान ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या दरम्यान मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.