ठाणे,12 मे 2017/AV News Bureau:
सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे प्रतिनिधी येत्या मंगळवारी (16 मे रोजी) ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
या दौ-यात अध्यक्ष रामुजी पवार सकाळी 10.45 ते 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे सफाई कर्मचा-यांच्या समस्यांबाबत विविध संघटनांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता ठाणे महापालिका सफाई कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पवार हे या दौ-यादरम्यान सफाई कामगारांच्या वस्त्यांना भेटी देणार आहेत. तसेच कामगारांशी चर्चा करणार आहेत.