मुंबई, 13 मे 2017/AV News Bureau:
रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात दोन्ही मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
मेन लाइन
- कल्याण-ठाणे अप फास्टलाइनवर सकाळी 10.15 ते दुपारी 4.15 पर्यंत
- सकाळी 11 ते दुपारी 4.21 या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट लाइनवरील सर्व गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप स्लो मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच कल्याण आणि ठाणे दरम्यान सर्व स्थानकांवर थांबविण्यात येतील. सर्व फास्ट लाइनवरील गाड्या नियमित स्थानकाव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यामुळे गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
- सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट मार्गावरील गाड्या आधीच्या नियमित स्थानकांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
- गाडी क्रमांक 50104 रत्नागिरी-दादर गाडी दिवा रेल्वे स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. तर गाडी क्रमांक 50103 दादर-रत्नागिरी गाडी दादर ऐवजी दिवा रेल्वे स्थानकातून सुटणार आहे.
- हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर लाइनवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान
- सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 या काळात सीएसटी ते पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठी सुटणाऱ्या गाड्या आणि सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 या काळात पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसटीला सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर लाइनच्या प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4 या काळात ट्रान्सहार्बर आणि मेन लाइनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.