मुंबई, 12 मे 2017/AV News Bureau:
युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरीझम ऑर्गनायझेशन (UNWTO) यांनी जाहीर केलेल्या शाश्वत पर्यटन विकास वर्ष 2017 तसेच व्हिजीट महाराष्ट्र वर्ष 2017 आणि 10 व्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. 16 मे रोजी सकाळी 9 वाजता मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात या परिषदेचे उद्घाटन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर असतील.
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून राष्ट्र विकासाला आणि ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सांयकाळी 5 या दम्यान विविध कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदचे उद्घाटन, कृषी पर्यटन गौरव पुरस्काराचे वितरण तसेच या कार्यक्रमात विविध राज्यातून येणारे कृषी तसेच पर्यटन क्षेत्रातील विशेषतज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जागतिक कृषी पर्यटक दिन कार्यक्रमाचे समन्वयक पांडुरंग तावरे यांनी दिली.