नवी मुंबई, 12 मे 2017 /AV News Bureau:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील 9 गावांमधील जमीन अधिसूचित करण्यात आली आहे. या संदर्भात प्रकल्पबाधितांना द्यावयाच्या पर्यायी जागेसंदर्भातील सोडती यापूर्वीच काढण्यात आल्या असून सर्व प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुनःस्थापन धोरणांतर्गत पर्यायी भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे येत्या सोमवारपासून वितरीत करण्यात येणार आहेत.
15 मे ते 19 मे या कालावधीत मेट्रो सेंटर 1, सिडको समाज मंदिर सभागृह, दुसरा मजला, सेक्टर 17, नवीन पनवेल येथे आयोजित विशेष कॅम्पच्या माध्यमातून हे वाटप करण्यात येणार आहे.
कॅम्पचे वेळापत्रक व तपशील खालीलप्रमाणे
संबंधित बांधकामधारकांची यादी, अध्यक्ष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित व पुनर्वसनबाधित दहा गावं संघर्ष समिती व संबंधित ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे देण्यात आलेली आहे. उर्वरित पात्र बांधकामधारकांना निवाडे/आदेश तथा वाटपपत्रे टप्प्याटप्प्याने सदर कॅम्पमार्फत वितरीत करण्यात येणार आहेत, असे सिडकोन कळविले आहे.