ठाणे, 11 मे 2017/AV News Bureau:
ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ता रुंदीकरणांतर्गत काम सुरु असल्याने ठाण्यातील काही परिसरातील विद्युत पुरवठा 12 मे रोजी खंडित करण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील मानपाडा चौक ते टिकुजिनीवाडी, मुल्लाबाग, कॉसमॉस लॉंज, २७ एकर, अॅक्मे, अग्रवाल इस्टेट , सहयोग कॉम्प्लेक्स, कृष्णानगर, नवशीबाई कंपाऊंड इत्यादी परिसरातील विद्युत पुरवठा 12 मे रोजी सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहील, असे विद्युत महामंडळाने कळविले आहे.