आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले
पनवेल, 11 मे 2017/AV News Bureau:
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे स्वतंत्र खारघर विकास आघाडी करणाऱ्या भाजपच्या नाराजांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
खारघर भाजपच्या काही इच्छुक उमेदवारांनी खारघर विकास आघाडी तयार करून अपक्ष अर्ज भरले होते.त्यामुळे भाजपला धक्का बसल्याचे मानले जात होते. परंतु पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवार होते. ज्यांना तिकीट मिळाले नाही असे प्रमुख पदाधिकारी नाराज होतील मात्र पक्ष सोडून जाणार नाहीत त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी चर्चा करून नाराजी दूर करू असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आघाडीतील उमेदवार राजेंद्र उर्फ मामा मांजरेकर,अजय माळी,संतोष शर्मा,सुनील बुचडे आणि विजय पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाला साथ देण्याचा निर्धार केला आहे. अभिमन्यू पाटील यांच्यासारखे खंदे समर्थक माघारी परतले आहेत. त्यामुळे भाजप अधिक ताकदीने निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या प्रभाग ५ च्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी खारघर विकास आघाडीचे उमेदवार आवर्जून हजर होते. त्यांचे स्वागत आणि अभिनंदन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले
-
जनतेची सेवा करणारे प्रामाणिक कार्यकर्ते नाराज राहणे योग्य न्हवते म्हणून वाय टी देशमुख आणि मी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समजूत काढली. आता ते पक्षाच्या प्रचारात शामिल झालेले आहेत. भाजपच्या विजयाचे ते नक्कीच शिल्पकार होतील अशी मला खात्री आहे.- माजी खासदार रामशेठ ठाकूर