नवी मुंबई, 10 मे 2017/ AV News Breaue:
वाशी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश कमलकिशोर तातेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सोपान गव्हाणे उपस्थित होते. 29 हजार 480 चौ.मी क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या या सहा मजली इमारतीमध्ये 21 न्यायदान कक्ष आहेत. त्यामुळे नवी मुंबईशी संबंधित अललेले ठाणे न्यायालयातील खटल्यांची सुनावणी आता या न्यायालयात होणार असून नवी मुंबईतील नागरिकांचे ठाणे न्यायालयात होणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत.
सध्या कार्यरत असलेले बेलापूर इथली न्यायालयेदेखील या नव्या इमारतीत स्थलांतरीत हणार आहे. या इमारतीमध्ये स्त्री वकील कक्ष, पुरूष वकील कक्ष, स्त्री व पुरूष कोठडी, कॉन्फरन्स रूम आहेत. या नव्या इमारतीमध्ये न्यायाधीशांची संख्याही वाढणार असल्यामुळे प्रलंबित खटल्यांचा निपटारा जलदगतीने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.