मुंबई, 9 मे 2017/AV News Bureau:
सध्या शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जंक फूड खाण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जंकफूड सतत खाण्यामुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, हृदयरोग तसेच इतर आजार मुलांमध्ये बळावतात. त्यामुळे शाळेच्या कॅन्टीनमध्ये यापुढे जंक फूड विकण्यास मनाई करण्यात आली आहे.
शालेय जीवनात मुलांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे लहानपणीच योग्य आहार मुलांना देणे गरजेचे आहे. मात्र आजकाल सर्रासपणे जंक फूड वा फास्ट फूड खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहेत. विशेषतः मुले आवडीने असे पदार्थ खात असतात.मात्र त्याचे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात. याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते आणि शेवटी विविध आजारांना निमंत्रण मिळते. या बाबीचा गांभिर्याने विचार करून महिला व बाल विकास मंत्रालयाने अधिक मीठ, साखर आणि मेदयुक्त पदार्थ न खाण्याबाबत मुले आणि पालकांना प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
साखर, मीठ आणि मेदाचा समावेश असलेल्या पदार्थांमध्ये शरिराला आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांची कमतरता असते. ज्यामुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह आणि हृदयरोग वाढीस लागण्यास मदत होते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक फूड ठेवण्यास आणि त्यांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
तर मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन जबाबदार
शासनाच्या निर्णयानुसार यापुढे कॅन्टीमध्ये जंक फूड ठेवणे वा विक्री करण्यास बंदी आहे. तरीही एखाद्या कॅन्टीनमध्ये बंदी घातलेले जंक फूड विद्यार्थ्यांसाठी विक्रीला ठेवल्यास त्याची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर राहणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाला या गोष्टींवर लक्ष ठेवावे लागणार आहे.
शाळेच्या कॅन्टीनमध्ये बंदी घातलेले पदार्थ
शाळेच्या कॅन्टीनमध्ये ठेवण्यास शिफारस केलेले पदार्थ