कलाकारांना कला दाखविण्याची संधी
मुंबई, 6 मे 2017 /AV News Bureau:
राज्यातील कानाकोपऱ्यात आपल्या संगिताच्या जादूने लोकांना वेड लागणाऱ्या हरहुन्नरी कलाकारांना आपली कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविता यावी यासाठी एक संधी आणि हक्काचे व्यासपीठ गरजेचे असते. ही गरज लक्षात घेवून झी युवा वाहिनी एक नवा कार्यक्रम सुरू करणार आहे. संगीत सम्राट असे या कार्यक्रमाचे नाव आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीतमय माणसाचा शोध , माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे .
या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे नाही तर संगीत सम्राट हा कार्यक्रम अशा कलाकारांसाठी आहे जे कोणत्याही वाद्द्यापासून , वस्तूपासून किंवा तोंडाने आवाज काढून श्रवणीय संगीत बनवू शकतील . या कार्यक्रमात मुख्यतः गायन , वाद्य वाजवणे , तोंडाने आवज काढून संगीत बनवणे ( Acapella , Beat Boxing ) असे परफॉर्मन्स सुद्धा असतील. या कार्यक्रमात तुम्ही एकट्याने किंवा समुहानाने सहभागी होऊ शकता . वयाच्या ४ वर्षांपासून ते आयुष्याच्या कोणत्याही वयातील मराठी बोलणारे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. ढोलपथके, बँड, गावागावातील संगीत , प्रत्येक प्रकारचं संगीत या कार्यक्रमात पाहायला मिळेल . महाराष्टात ज्यांच्या रक्तात संगीत आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे .
या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स ३ मे पासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु झाल्या आहेत. आता ६ मे ला औरंगाबाद मध्ये सरस्वती भुवन शाळेच्या आवारात ही ऑडिशन होतील. ह्या ऑडिशन्स सकाळी ८ ते दुपारी २ या दरम्यान घेतल्या जातील . या ऑडिशनला कसलीही फी नाही . त्यामुळे कोणालाही कसलेलंही पैसे दयायची गरज नाही . ऑडिशनच्या जागी येऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे . ज्याच्यापासून संगीत निर्मिती होऊ शकते अशी वाद्ये किंवा इतर अश्या वस्तू घेऊन येऊ शकता.
औरंगाबाद नतर संगीत सम्राट ची टीम ८ मे ला नाशिकमध्ये रचना विद्यालय , १० मे ला पुण्यात ज्ञानसागर इन्स्टिट्यूट मॅनजेमेंट आणि रिसर्च , १२ मे ला कोल्हापूरमध्ये खासबाग मधील प्रायव्हेट हायस्कूल आणि १४ मे ला मुंबईमध्ये ब्राम्हण शिक्षण मंडळ प्राथमिक विद्यालय नौपाडा ठाणे येथे ह्या ऑडिशन्स होतील. संगीत सम्राट या टॅलेन्ट हंट कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि गायक आदर्श शिंदे हे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.