मुंबई, 6मे 2017/AV News Bureau:
रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात दोन्ही मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
माटुंगा-मुलुंड डाउन फास्ट मार्गावर सकाळी 10.15 ते दुपारी 3.15 पर्यंत
- सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या डाउन फास्ट गाड्या माटुंगा-मुलुंड दरम्यान स्लो मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच सायन आणि मुलुंड दरम्यान सर्व स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यामुळे गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील. ठाण्यापासून पुढे जाणाऱ्या सर्व फास्ट गाड्या मुलुंडपासून पुन्हा फास्ट मार्गावरून चालविण्यात येतील.
- सकाळी 10.46 ते दुपारी 3.18 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट मार्गावरील फास्ट/ सेमी फास्ट गाड्या नेहमींच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबविण्यात येतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
- सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या आणि परत येणाऱ्या स्लो मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.
- मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी आणि दादरहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान स्लो मार्गावरून चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- सीएसटी-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसटी अप मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
- सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 या काळात सीएसटीहून वाशी,बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या आणि 10.38 ते दुपारी 4.43 या काळात सीएसटीहून वांद्रे, अंधेरीकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 या काळात पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसटीकडे जाणाऱ्या अप गाड्या आणि सकाळी 10.44 ते दुपारी 4.13 या काळात वांद्रे, अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावर प्लॉटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
- मेगाब्लॉकच्या काळात हार्बरमार्गावरील प्रवाशांना मेन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात प्रवास करण्याची परवानी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.