नवी मुंबई, 4 मे 2017/AV News Bureau:
ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीत येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त आणखी तीन अधिकच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या तीन अधिकच्या सुट्ट्या ठाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकरिता लागू असणार आहेत. यामध्ये 7 ऑगस्ट 2017 रक्षाबंधन, 5 सप्टेंबर 2017 अनंत चतुर्दर्शी आणि 18 ऑक्टोबर 2017 नरक चतुर्दर्शी हे दिवस स्थानिक कार्यालयांसाठी सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.