नवी मुंबई, 3 मे 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापालिकेच्या कर आणि मालमत्ता कर विभागाने प्रभावीपणे मोहिम राबविल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर उत्पनात 300 कोटींची वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये स्थानिक संस्था कर विभागाने गेल्या वर्षाच्या तुलनेत 152 कोटी तसेच मालमत्ता कर विभागाच्या उत्पन्नात 140 कोटींची वाढ झाली आहे.
स्थानिक संस्था कर बंद होऊनही या विभागाने वर्षभरात 152 कोटी इतकी उत्पन्नाची मजल मारल्याने स्थानिक संस्था कर वसुलीचा आकडा 2016-17 मध्ये 1022 कोटी 41 लाखांपर्यत पोहोचला आहे. 2015-16 मध्ये स्थानिक संस्था कराची वसूली 870 कोटी होती. तर 2016-17 मध्ये 1022 कोटी झाली. ही थकबाकी वसूलीसाठी 1100 थकबाकीदारांची खाती गोठविण्यात आली. याशिवाय उपकराची 70 कोटींची जुनी थकबाकीदेखील वसूली करण्यात आली.