मुंबई, 30 एप्रिल 2017:
येत्या शुक्रवारी भारत दक्षिण आशिया उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. हा उपग्रह केवळ भारतासाठीच उयुक्त ठरणार नसून दक्षिण आशियातील सर्व देशांना त्याचा लाभ होणार आहे. संपूर्ण दक्षिण आशियात सहकार्य वृध्दिंगत करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल असून तसेच ही अतिशय अमूल्य भेटही आहे,असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात केले.
भारताने नेहमी ‘सबका साथ-सबका विकास’ हा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा आम्ही ‘सबका साथ-सबका विकास’ म्हणतो तेव्हा तो केवळ भारतात नाही जागतिक संदर्भातही असतो. 5 मे रोजी भारत दक्षिण-आशिया उपग्रह प्रक्षेपित करेल. या उपग्रहाची क्षमता आणि त्याच्याशी संबंधित सुविधा दक्षिण आशियाचे आर्थिक तसेच विकास विषयक प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात खूप सहाय्य्यभूत ठरतील. मग ते नैसर्गिक साधनसंपत्तीचं मॅपिंग करणे असेल, दूरसंचार ,औषध क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल किंवा अधिक सखोल माहिती तंत्रज्ञान जोडणी असेल, लोकांमधील संपर्काचा प्रयत्न असेल. दक्षिण आशियाच्या या उपग्रहामुळे आपल्या संपूर्ण प्रदेशाला पुढे जाण्यासाठी मदत होईल. संपूर्ण दक्षिण आशियाबरोबर सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. दक्षिण अशियाप्रती आपल्या कटिबद्धतेचे हे एक उपयुक्त उदाहरण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
उपग्रहाची माहिती
- उपग्रहाचे नाव -जीसॅट 09
- वजन 412 टन
- लांबी 50 मीटर
- वजन 2230 कि. ग्रॅ.
- उपग्रह निर्मितीचा खर्च सुमारे 235 कोटी
- उपग्रह निर्मितीसाठी लागलेला कालावधी 3 वर्षे