बोर्ली मांडला, 30 एप्रिल 2017/AV News Bureau:
कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ व ’मावळा प्रतिष्ठान अलिबाग’ यांच्यावतीने आज आलिबाग समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिरसरातील तरुणांनीही उत्फूर्तपणे या स्वच्छता मोहिमेत सहभागी होवून आपले समुद्र किनारे स्वच्छ राखण्यासाठी मदत करा, असे आवाहन पर्यटकांनाही केले.
अलिबाग कस्टम कार्यालय ते जेएसम कॉलेज पर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यांत आली. या स्वच्छत मोहीमे अंतर्गत एक ते दीड टन कचरा गोळा करण्यांत आला. ही स्वच्छता मोहिम यशस्वी करण्यासाठी कुलाबा किल्ला गणेशोत्सव मंडळ सर्व स्वयंसेवक, हरीओम मित्रमंडळाचे सदस्य, मावळा प्रतिष्ठानचे सदस्य, घोडागाडी संघटना, प्रवासी बोट संघटना यांच्या सह कुलाबा किल्ला गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष गजान टिके, अॅड.सागर पाटील, किशोर अनुभवणे, समीर मधुकर ठाकूर, जनार्दन भगत, उमेश झिटे, गजा कुंडी, प्रकाश पोरे, पिलणकर रावसाहेब, यतिराज पाटील, मानस कुंटे, दिनेश पाटील, बंटी मोकल, राजु वागळे व नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थीत होते.
उदया 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आहे. त्या निमीत्ताने ही स्वच्छता मोहिम आखली असून अलिबागमधील सर्व सामाजिक संस्थांनी वेळापत्रक आखून अलिबाग सुमूद्र किना-याची स्वच्छता अगदी आठवडयातुन एकदा केली तरी आपल समुद्र किनारा स्वच्छ रहाण्यास मदत होईल असे प्रतिपादन अॅड.सागर पाटील यांनी केले.