नवी मुंबई, 27 एप्रिल 2017 /AV News Bureau:
वाशी विभागातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक जागेत पोस्टर, बॅनर लावून, तसेच भिंतीवर रंग रंगोटी, रस्त्याच्या चौकात, झाडावर, दिवाबत्ती पोलवर जाहिरातीचे फलक उभारून शहराच्या सौंदर्यास बाधा करणा-या 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली होती.
- गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कंपन्या/संस्था
वाशी सेक्टर 9 येथील अक्षर सुलेखन, मास्टर डिप्लोमा कार्ड सेंटर, योगा सुमेर कोर्ल विद्या निकेतन, ड्रायव्हर्स इन इंडिया टेम्पररी ॲण्ड पर्मनन्ट, व्हेकन्सी पार्ट टाईम ॲण्ड फुल टाईम कॉम्प्युटर बेसिक वर्क, प्रोजेक्ट एक्सपोर्ट प्राईमवेरा ऑथराईज्ड ट्रेनिंग सेंटर ॲण्ड पदव्यास रेविट अप, हाऊस पेंटींग, गुड न्युज फ्री टाईम पार्ट टाईम वर्क्स, रिपेअर ॲण्ड मेंटेनंट्स JSM एअर कुल एसी/फ्रीज इलेक्ट्रीक, ईम्पॅक्ट सेल्फ डिफेन्स ॲण्ड कमबॅक इन्स्टिट्युट, आनंद ॲकेडमी ॲडमिशन, प्लॅनिंग फॉर MBA/MMS, कट 2017, MHCET, प्रविण शिप्स इंजिनिअरिंग क्लासेस, सिझा इंटरनॅशनल टुर ॲण्ड ट्रॅव्हलर्स, तसेच वाशी सेक्टर 17 येथील दिशा कम्प्युटर इंन्स्टिट्युट, स्पीक वेल, राजेश केबल इंटरनेट यांच्या विरोधात गुन्हे दाखल कऱण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.