मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे बंद होणार

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2017 :

पंतप्रधान, मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे आता कायमचे बंद होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  1 मे पासून हा  नवीन नियम लागू होणार आहे.

या निर्णयामुळे केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, भारताचे मुख्य न्यायाधीश, लोकसभेचे सभापती या पाच संवैधानिक पदांवरील व्यक्तींनाच हा लाल दिवा वापरता येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे.   काही महिन्यांपूर्वी याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता.

देशातील व्हीव्हीआयपी कल्चरला चाप बसविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ संवैधानिक पदावरील व्यक्तींनाच लाल दिव्याच्या गाडीचा वापर करण्याचा अधिकार असावा, असा प्रस्ताव गडकरींनी दिला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.